घरमहाराष्ट्रनाशिकमालेगाव येथील सुताच्या फॅक्टरीला आग; २४ तासात आगीची दुसरी घटना

मालेगाव येथील सुताच्या फॅक्टरीला आग; २४ तासात आगीची दुसरी घटना

Subscribe

मालेगाव शहरात सुत फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मालेगाव शहरात टायर गोदामाला सोमवारी आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. मालेगावमधील चाळीसगाव फाटा येथील सायने बुद्रुक या ठिकाणी असलेल्या सुत फॅक्टरीला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. शिवारातील जाखोटिया यांची ही सुताची फॅक्टरी असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मालेगाव येथील सुताराच्या फॅक्टरीला आग #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -