घरमहाराष्ट्रनाशिकमोठा दिलासा! दुकानांचा वेळ रात्री ८ पर्यंत... वाचा काय आहे नियमावली

मोठा दिलासा! दुकानांचा वेळ रात्री ८ पर्यंत… वाचा काय आहे नियमावली

Subscribe

शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता, आजपासून होणार अंमलबजावणी, रविवारी मात्र लॉकडाउन

राज्यातील व्यावसायिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता राज्य सरकारने अखेर दुकानांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेशही आज सायंकाळी जारी केला. या आदेशांनुसार सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७ ते रात्री ८, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.

अशी आहे नवी नियमावली

  • सर्व प्रकारची दुकाने व शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील
  • शनिवारी मात्र दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार
  • रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहतील
  • सर्व मैदाने, उद्याने ही व्यायाम, वॉक, जॉगिंग व सायकलिंगसाठी खुली ठेवण्यास मंजुरी
  • सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
  • कृषी, औद्योगिक, नागरी, दळणवळणाची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास मंजूरी
  • जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील
  • सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील
  • रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -