Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम विसरभोळेपणा पडला महागात, चावी विसरला अन् घडले भलतेच

विसरभोळेपणा पडला महागात, चावी विसरला अन् घडले भलतेच

चोरट्याने संधी साधत दुचाकी केली गायब

Related Story

- Advertisement -

पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन दुचाकीला चावी ठेवून जाणे एका वाहनचालकाला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीला चावी दिसताच आणि दुचाकीजवळ कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना गंजमाळ, रॉयल हेरीटेजजवळ घडली. याप्रकरणी नामदेव गांगुर्डे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नामदेव गांगुर्डे दुचाकीवरुन गंजमाळ परिसरात आले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. ते घाईत असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन ते पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोलपंपाकडे गेले. त्यावेळी ते दुचाकी हॅण्डल लॉक व चावी न घेता निघून गेले. दुचाकीला चावी दिसताच आणि दुचाकीजवळ कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. पुढील तपास पोलीस हवालदार ढोली करत आहेत.

- Advertisement -