घरमहाराष्ट्रनाशिककोरोना नियंत्रणासाठी मनमाड शहर सज्ज

कोरोना नियंत्रणासाठी मनमाड शहर सज्ज

Subscribe

सद्यस्थिती आटोक्यात असून एकाही रुग्णाला दाखल करण्याची वेळ आलेली नाही.

मनमाड : पहिल्या आणि दुसर्‍या लाटेप्रमाणे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने मनमाड शहर परिसरासोबत नांदगाव तालुक्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बाधितांचा आकडा 197 पर्यंत गेला आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी दिली.

सद्यस्थिती आटोक्यात असून एकाही रुग्णाला दाखल करण्याची वेळ आलेली नाही. यापुढे परिस्थिती गंभीर बनल्यास त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क होऊन पुरेसे बेड्स आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे यांनी दिली. शुक्रवारी सर्व मस्जिदमधील मौलाना, सर्वधर्मीय धर्मगुरूंची पालिकेत बैठक घेण्यात झाली. त्यात लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे, मौलाना हाजी उस्मान साहब, मौलाना अस्लम रिजवी, हाफिज रेहान, हाजी मकसूद, सुलेमान रजा कादरी, फिरोज शेख, अख्तर शेख, रईस फिटर, शेख अक्रम वसीम, इकबाल सय्यद, चिराग सय्यद, पालिकेचे अजहर शेख, पोलीस गोपनीय विभागाचे सुनील पवार आदी उपस्थित होते. पोलिसांनीही विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -