घरताज्या घडामोडी'गरज नसतानाही अनेक जण रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत'

‘गरज नसतानाही अनेक जण रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत’

Subscribe

'गरज नसतानाही अनेक जण रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत उभे राहत असल्याचा', दावा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा, रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवावा तसेच सर्वच पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्यावेत या मागण्यांसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी आज, शनिवारी सकाळी नाशिकमधील मेहेर सिग्नलवर ठिय्या आंदोलन केले. याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारणा केली असता ‘गरज नसतानाही अनेक जण रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत उभे राहत असल्याचे’, त्यांनी म्हटले आहे.

तात्काळ गरज नसताना देखील रांगेत उभे

नाशिकमध्ये आज सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने आंदोलन केले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी देखील केली. याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारणा केली असता, ‘ज्या व्यक्तींना तात्काळ गरज आहे, अशा व्यक्ती रांगेत उभ्या राहतात. तसेच ज्या व्यक्तींना तात्काळ गरज नाही तेही उभे राहत आहेत. त्यांना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेले असते, परंतु त्यांना त्याची तात्काळ गरज नसते. मात्र, तरी देखील अनेक नागरिक रांगेत उभे राहतात. यामध्ये काही डॉक्टर, खासगी रुग्णालयाचे लोक, काही पैशेवाले लोक तर काही, असे लोकही रांगेत होते ज्यांना चिठ्ठीत काय लिहिले आहे हे देखील माहिती नव्हते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन हवे की नको हे डॉक्टर ठरवणार. त्यामुळे चिठ्ठीशिवाय कोणालाही आता रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येणार नाही’, असे भुजबळांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, आज ज्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले होते. त्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी असल्याचा दावा नातेवाईकांनी केला. त्यामुळे ज्या व्यक्तींना गरज होती त्याच व्यक्ती रस्त्यावर उतरल्या होत्या, असे भुजबळांना सांगण्यात आले. यावर भुजबळांनी दोन दिवस थांबा ही परिस्थिती सुधारेल, असे नाही आहे की, महाराष्ट्र सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करत नाही. आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्यासाठी देखील सांगितले आहे. तसेच हे औषध सहज उपलब्ध होण्यासारखेही नाही आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन प्रमाणे लसींची देखील अडचण आहे. याबाबत राज्य सरकारला कोणतीही माहिती नव्हती की, एवढा प्रादुर्भाव होईल आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यता भासेल. मात्र, आता राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यानुसार लसीच्या साठ्यासोबत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्याबाबत सध्या राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.


हेही वाचा – रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन बेडसाठी नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -