घरमहाराष्ट्रनाशिकलोकसभा निवडणुकीतील मतदार ‘विधानसभे’त गायब

लोकसभा निवडणुकीतील मतदार ‘विधानसभे’त गायब

Subscribe

याद्यांमध्ये नावे नसल्याने मतदारांचा संताप; केंद्रापर्यंतची पायपीट ठरली निष्फळ

नेहमीप्रमाणे यंदाही मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे गायब झाल्याचा अनुभव आला. मतदानाचे राष्ट्रीय कतृत्व बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना ज्यावेळी समजले की, आपले नावच यादीत नाही, त्यावेळी ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्य लोकांबरोबर राजकीय पुढार्‍यांनाही नावे गायब झाल्याचा अनुभव आला हे विशेष. महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावे मतदारयादीत होती त्यांची नावे विधानसभा निवडणुकीत उडाल्याच्या तक्रारी दिवसभर प्राप्त होत होत्या.

सकाळी ७ वाजेपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. परंतु यादीत नावेच नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. मतदानापूर्वी मतदारांच्या घरपोच मतदार चिठ्ठीत मिळणे अपेक्षित होते; मात्र बहुतांश मतदारांना चिठ्ठी प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्रांवर गोंधळ उडाला. मतदारांचा उत्साह प्रचंड असला तरी शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका मतदारांना बसत होता. पावसाळी वातावरणात मतदानासाठी गेलेल्या नागरिकांचा यादीत नाव नसल्याने अधिक संताप झाला. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे नावे शोधताना मतदारांची चांगलीच दमछाक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -