घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळांना बसण्यासाठी खुर्ची दिल्याने मराठा आंदोलक संतप्त

भुजबळांना बसण्यासाठी खुर्ची दिल्याने मराठा आंदोलक संतप्त

Subscribe

छत्रपती संभाजीराजेंच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला

 मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सोमवारी मुक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. मात्र, सर्व नेते व आंदोलक हे जमिनीवर बसलेले असतांना भुजबळांना बसण्यासाठी खुर्ची दिल्याने त्यावरुन आंदोलक संतप्त झाले. राजे जमीनीवर बसले असतांना भुजबळांना बसण्यास खुर्ची का दिली म्हणून आंदोलकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. संभाजीराजेंनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केले.

नाशिक येथे आयोजित मराठा आंदोलनाप्रसंगी भुमिका मांडण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे यांच्यासह आंदोलक आधीच आंदोलनस्थळी पोहोचले होते. ते सर्वच जण जमिनीवर बसले होते. त्यानंतर एकामागोमाग एक लोकप्रतिनिधी दाखल झाले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील आंदोलन स्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची देण्यात आली.भुजबळ यांना बसायला खुर्ची दिली म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. संभाजीराजे खाली बसले असताना भुजबळांना खुर्ची दिली गेल्यामुळे संताप व्यक्त केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे स्वतः समोर आले. भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसू द्या, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. त्यानंतर वाद मिटला. छगन भुजबळ यांनी देखील आंदोलन स्थळी मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल खुलासा केला. मला पाठीचा त्रास असल्याने मी खुर्चीवर बसलो होतो असे ते म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -