घरताज्या घडामोडीमराठा क्रांती मोर्चाचे भुजबळांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे भुजबळांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

Subscribe

भेट न झाल्याने घरावर निवेदन चिकटवून जोरदार घोषणाबाजी

आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी, शुक्रवारी नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मला घेराव घातला.यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. आक्रमक आंदोलकांनी, जागोजागी लावलेले पोलीस लोखंडी बॅरिकेट्स पार करून जोरदार घोषणाबाजी करत, भुजबळ फार्मकडे वाटचाल केली. यावेळी भुजबळ फार्मच्या प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यात मात्र दोन तास उलटूनही भुजबळ यांची भेट न झाल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशव्दारावरील गेटला आंदोलन चिकटवून भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भुजबळ मराठा विरोधी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेलेल भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाच्यावतीने त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक शासकीय नोकरी भरती होत असल्याचा मुददा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे ही भरती रदद करावी तसेच मराठा आरक्षणाशिवाय अशाप्रकारे भरती करू नये. शैक्षणिक कारणासाठी मराठा समाजाला आरक्षण लाभ देण्यात यावा अशा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.

- Advertisement -

यासंदर्भात वटहुकुम काढण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे त्यासाठी सर्व आमदार, खासदारांनी पत्र पाठवून विशेष अधिवेशनाची मागणी करावी यासाठी समाजाच्यावतीने भुजबळ यांना निवेदन देण्यात येणार आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भुजबळांच्या निवासस्थानाकडे वाटचाल करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अखेर फार्मच्या प्रवेशद्वारावर त्यांना पोलिसांनी रोखले. नियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ त्र्यंबकेश्वरला गेले असल्याने याच ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत पालकमंत्री छगन भुजबळ येणार नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतली. मात्र दोन तास उलटूनही भुजबळ आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी न आल्याने अखेर आंदोलकांनी त्यांच्या निवास्थानाला निवेदन चिटकून भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

भुजबळांनी राजीनामा द्यावा

गेल्या दोन तासांपासून आम्ही आंदोलन केले. परंतु भुजबळांनी आम्हाला हेतुपुरस्कार डावलले. आम्हाला तीन वेळा वेळ देवूनही त्यांनी निवेदन स्विकारलेले नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच विषयीची भुमिका स्पष्ट करावी. अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

हे तर राजकिय षडयंत्र

मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी सर्वच पक्षांची भुमिका आहे. मात्र केवळ मला बदनाम करण्याच्या दृष्टीनेच असे आरोप केले जात आहे यामागे राजकिय षडयंत्र असल्याचा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. माझे कार्यक्रम दहा दिवसांपूर्वीच नियोजित होते. याबाबत आंदोलनकर्त्यांनाही वेळ कळविण्यात आली होती. त्यावेळेत ते जर आले असते तर मी नक्कीच त्यांना भेटलो असतो.
                                                                                                                -छगन भुजबळ, पालकमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -