घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराख साठेबाजीविरोधात तहसीलवर मोर्चा

राख साठेबाजीविरोधात तहसीलवर मोर्चा

Subscribe

नाशिक : एकलहरे प्रकल्पातील राखेच्या बंधार्‍यातील राखेचा साठा व मनमानी करणार्‍यांच्या विरोधात जिल्हाभरातील शेकडो ट्रक चालक-मालक व वीटभट्टीधारकांनी नाशिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. आंदोलनकर्त्यांनी कारवाई होईपर्यंत ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर तहसीलदार अनिल दौंडे यांनी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोराडी प्रकल्पातील खसाळा येथील राखेचा बंधारा दि. १६ जुलै रोजी फुटल्यानंतर एकलहरे प्रकल्पातील राख उपसा बंद होण्याचे संकेत मिळताच काही व्यावसायिकांनी एकलहरे, कोटमगाव व हिंगणवेढे गावाच्या शिवारातील जमिनीत राखेचा साठा केल्याचे निदर्शनास आले होते. याच कालावधीत असंख्य ट्रक चालकांना राख मिळत नसल्याने ट्रक चालक-मालक संघटनेकडून विरोध करण्यात आला, दरम्यान दि. १० ऑगस्ट रोजी महानिर्मिती कंपनीने राख उपसा बंद करण्याचे आदेश जारी केल्याने राखेचा तुटवडा भासत होता. यामुळे वरील कालावधीत बेकायदा राख साठा करत दहशत करणारे व मनमानी करणार्‍यांविरोधात बुधवारी (दि.१७) दुपारी मनसे तालुकाध्यक्ष व ट्रक चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी सुनील गायधनी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो ट्रक चालक-मालक व वीटभट्टी मालकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

- Advertisement -

यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर तहसीलदार दौंडे यांनी सांगितले की, निवेदनात उल्लेख केल्या प्रमाणे संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. मात्र, महसूल विभागाच्या व्यतिरिक्त इतर संबंधित आस्थापनाबरोबर पत्रव्यवहार करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मोर्चात नाशिकसह इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड, दिंडोरी आदी तालुक्यांसह जिल्ह्यातील शेकडो सभासद व पदाधिकारी सहभागी झाले होते.

निवेदनातील मागण्या

  • जमिनीत अनैसर्गिक केलेल्या
  • खड्ड्यातून गौण खनिज विक्री करुन अवैध राखसाठा करणार्‍यांवर कारवाई करा
  • परिसरातील वीट उत्पादक, पेव्हर ब्लॉक, प्रिकास्ट वॉलसाठी लागणारी राख प्राधान्याने मिळावी
  • मोजके राख साठवणूकदार परिसरातील वाहनचालकांना वेठीस धरत त्यांच्याकडून अतिरिक्त पैशांची मागणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -