Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक बाजार समिती निवडणूक : लासलगाव, पिंपळगाव ब. मतदारांची नावे संकलन सुरु

बाजार समिती निवडणूक : लासलगाव, पिंपळगाव ब. मतदारांची नावे संकलन सुरु

Subscribe

नाशिक : निफाड महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समीसमित्यांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या व्यवस्थापक मंडळाची यादी म्हणजे मतदारांची नावे संकलन करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. पात्र सहकारी संस्थांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून आपापल्या संस्थांच्या व्यवस्थापकीय मंडळाची यादी सुपूर्द करावी, अशा सूचना निफाड तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक रणजित पाटील यांनी दिल्या आहेत.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार सामीत्यांची पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यासाठी अगदी काही दिवसाचा अवधी बाकी असताना सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आता या निवडणुकीसाठी लागणार्‍या मतदार याद्यांचे कामे सुरू झाले आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या याद्या म्हणजेच मतदारांची नावे संकलन करण्याचे काम सहकार विभागाने सुरू केले आहे निफाडच्या सहाय्यक निबंध कार्यालयाने याबाबत नुकतेच तातडीचे पत्र काढून संबंधित सहकारी संस्थांना कळविले आहे की, प्राधिकरणाच्या सूचनेप्रमाणे ज्या कृषी उत्पन्न बाजार समीत्यांची मुदत संपलेली आहे किंवा ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणार आहे, अशा कृषी उत्पन्न बाजार समीत्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे काम करण्यास प्राधान्य देण्यास कळविले आहेत त्यानुसार ज्या त्या बाजार समीत्याच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनी तातडीने आपापल्या व्यवस्थापकीय मंडळाची यादी व त्यासोबत ते व्यावस्थापकिय मंडळ निवडून आल्याचे निकाल पत्र तसेच रिक्त असलेल्या संचालकांच्या ठिकाणी स्वीकृतीने ती जागा भरली असल्यास त्यासंबंधीचा ठरावाची प्रत सोबत जोडणे अनिवार्य आहे.

- Advertisement -

सहकारी संस्थांची यादीसाठी १ सप्टेंबर २०२२ हा अर्हता दिनांक धरण्याचेही पत्रात सूचित करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील सर्व पात्र सहकारी संस्थांनी आपापल्या व्यवस्थापकी मंडळाची यादी वेळेत संबंधित अधिकार्‍याकडे देऊन निवडणूक कामास प्राधान्य द्यावे असेही कळविले आहे. पात्र सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकीय मंडळाची यादी छाननी व चौकशी करून समाविष्ट करण्यासाठी खालील अधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.

यांच्यावर जबाबदारी 

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समीतीसाठी कक्ष क्रमांक १
बी. वाय थेटे -सहकार अधिकारी (श्रेणी २)- कक्ष प्रमुख ,
के एल सोनवणे- सहकार अधिकारी (श्रेणी २)- सहाय्यक
के आर पीठे- सहाय्यक सहकार अधिकारी- सहाय्यक

- Advertisement -

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती साठी कक्ष क्रमांक २
राजेश ढवळे सहकार अधिकारी ( श्रेणी-१ ) कक्ष प्रमुख
श्रीमती जे.ए. गवळी- सहाय्यक सहकार अधिकारी -सहाय्यक
डी एस जगताप कनिष्ठ लिपिक -सहाय्यक

- Advertisment -