घरमहाराष्ट्रनाशिकमहागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

Subscribe

नवीन नाशिक : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) शहर कमिटीच्या वतीने ऍड. तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली त्रिमूर्ती चौक ते उत्तम नगर असा मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चे भाव कमी करा, गॅससिलेंडरचे अनुदान चालू करा,वाढती महागाई कमी करा यासारख्या मागण्या घेऊन शेकडो कामगार व नागरिकांसह माजी नगरसेवक व गटनेता ऍड.तानाजी जायभावे,तुकाराम सोनजे,अरविंद शहापूरे,विवेक ढगे, दिपक कोर, ज्ञानेश्वर माळी,निलेश मगर, दिपक घोरपडे, राजु सोनवणे,संजय माळी, भीमराव गायकवाड, निलेश तिदमे,राकेश पाटील,राजाराम शेवाळे,प्रदीप देसले,निंबा मराठे, चेतन चव्हाण,बापू सरोदे,मीरा सोनवणे, विजया तिक्कल यासह विविध कंपनीतील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मागील काही वर्षांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य जनता, गरीब, कामगार, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्व वर्गाला सध्या महागाईचा फटका सहन करावा लागतो आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने शंभरी पार केली असून रेशन दुकानावर मिळणारे रॉकेल बंद झाले आहे. सध्या स्वयंपाकाचा गॅस हजाराच्या पार गेला असल्याने गरिबांना चूल पेटवण्यासाठी लाकडे मिळणे देखील अवघड झाले आहे. इंधनापासून ते खाद्यपदार्थ, गोडेतेल, दूध, इंधनापासून ते खाद्यपदार्थ, भाजीपाला तसेच औषधोपचार आणि शैक्षणिक फी अशा सर्वच घटकांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ही फार मोठी चिंतेची बाब आहे. महागाईचा आलेख दिवसागणिक वाढतो आहे. दुसरीकडे बेरोजगारीची समस्या ही झपाट्याने वाढत आहे. केंद्रातील शासनकर्ते या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी ऍड.तानाजी जायभावे यांनी केला.

- Advertisement -

केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी सुडाचे राजकारण करीत आहेत. नव-नवीन प्रश्न उकरून काढत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध करून
देशात वाढती महागाई हा फार मोठा चिंतेचा विषय असताना जाती-धर्माच्या विषयात लोकांना गुंतवून ठेवले जाते आहे. या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
उत्तमनगर येथे मोर्चा चा समारोप करण्यात आला. विवेक ढगे यांनी समारोप करून उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -