घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात आयुष्यमान भारत योजनेचे महाशिबिर उद्यापासून

नाशकात आयुष्यमान भारत योजनेचे महाशिबिर उद्यापासून

Subscribe

२३ ऑगस्टपर्यंत बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये चालणार शिबीर

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरित करण्यासाठी शुक्रवार (ता.९) पासून २३ ऑगस्टपर्यंत बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महाशिबिराचे आयोजन केले आहे.

शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. वयस्कर किंवा तरुण वयातील महिला-पुरुषांना कर्करोग, हदयविकास, किडनीचे आजार, मेंदू विकार यांनी ग्रासल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते. या आजारांवरील उपचारासाठी आयुष्यमान योजना उपयुक्त ठरणार आहे. या योजनेनुसार सर्वसामान्य रुग्णाांना खासगी रुग्णालयातही उपचार घेता येतील. गंभीर स्वरुपांच्या आजारावर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च शासनाकडून केला जाणार आहे.

- Advertisement -

कुटुंबातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकाकडे योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. मध्य नाशिक विधासभा मतदार संघातील रहिवाशांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आ. फरांदे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -