घरताज्या घडामोडीकरोनाग्रस्तांसाठी म्हाडाची घरे वापरणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

करोनाग्रस्तांसाठी म्हाडाची घरे वापरणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Subscribe

तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

मालेगाव शहरात शहरातील करोना विषाणूमुळे बाधित होणार्‍या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रूग्णांसाठी सोयी सुविधांची कमतरता भासू नये याकरीता शहरालगत असलेल्या म्हाळदे शिवारात म्हाडाची नवनिर्मीत घरे उपयोगात आणणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. म्हाळदे शिवारातील नवनिर्मीत घरांची आज पहाणी करुन तेथील सोयी सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

मालेगाव शहरातील वाढती रूग्णसंख्या विचारात घेता सध्या करोना रूग्णांच्या उपचारासाठी खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करण्यात आले आहे. मात्र हे रूग्णालयातील सुविधाही अपुर्‍या पडू नये याकरीता आता करोनाग्रस्तांसाठी म्हाडाच्या घरांचा वापर करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर विश्रामगृहात कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. मालेगाव मधील रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी रूग्ण जर वेळेवर दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य व्यवस्थेची आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता, आजाराची कोणती लक्षणे आढळल्यास, तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे, यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

रमजानसाठी विशेष व्यवस्था

उद्यापासून सुरू होणारया पवित्र रमाजन सणाच्या पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवांना उपवास सोडण्यासाठी लागणार्‍या फळांचा पुरवठा होण्यासाठी हॉटेल स्टार जवळील मोकळ्या जागेत बॅरिकेटींगसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सुचना दिल्या. कंटेन्टमेंट झोन व बफर झोनमधील उपलब्ध मनुष्यबळ व स्वयंसेवकांचा पुरेपूर वापर करुन महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार्‍या सोयी सुविधा ह्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत असल्याची खात्री करावी. भाजीपाला व दुधाचे नियोजन यापुर्वीच करण्यात आले आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष वितरण होत असल्याची रोज खात्री करावी असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अहवालासाठी पाठपुरावा करावा

दाखल होणारे संशयित कोरोना रुग्णांसह, विलगीकरण केलेली, व ज्यांचे नमुने तपासणीसाठी गेले आहेत अशा रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर अपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक अधिकार्‍यांना लेखी स्वरुपात जबाबदारी सोपवावी, आणि प्रत्येकाने ती मनापासून व प्रामाणिकपणे पार पाडावी असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -