घरमहाराष्ट्रनाशिककळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, चार गावांतील ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट

कळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, चार गावांतील ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट

Subscribe

सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कळवण तालुक्यातील गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. तालुक्यातील दळवट हे भूकंपाचे केंद्र असुन, या ठिकाणी यापुर्वीही अनेक वेळा भुकंपाचे धक्के बसले आहेत.

कळवण तालुक्यातील बिलवाडी, देवळी वणी, जामलेवणी, बोरदैवत येथे रविवार, २७ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने या गावांमधील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. भूकंपाच्या धास्तीने काही नागरिक ऐन थंडीतही घराबाहेरच झोपले.

सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कळवण तालुक्यातील गावांमधील नागरीकांनी भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले. ज्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले तेथील घरांमधील भांडे पडणे, विजेच्या तारा व विजेचे पोल हलणे असा अनुभव गावकऱ्यांनी घेतला. धक्के जाणवू लागताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सायंकाळपासुन भूकंपाचे लहान-मोठे चार धक्के बसले, तर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पुन्हा मोठा हादरा बसल्याची माहिती बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे सरपंच सोनीराम गांगुर्डे यांनी तलाठ्यांना दिली. भुकंपाचे धक्के बसलेल्या गावांमधील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -