घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिंडोरी तालुक्यात भुकंपाचा सौम्य धक्का

दिंडोरी तालुक्यात भुकंपाचा सौम्य धक्का

Subscribe

२.७ रिश्टर स्केलची नोंद

नाशिक । दिंडोरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांना माहीती देण्यात आली. मेरी येथील भुकंपमापन केंद्रात या भुकंपाची नोंद झाली असून तालुक्यातील मडकीजाम, वनारवाडी येथे भुकंपाची नोंद करण्यात आली आहे.

या धक्कयांमुळे कोणतीही मनुष्य व वित्तीय हानी झालेली नाही. दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या डोंगराळ आदिवासी पटटयात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. तालुक्यात शुक्रवारी जाणवलेल्या धक्क्यांमुळे तालुक्यातील दहा गावांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी हादरा बसला. गावातील घरांच्या भिंती हादरत असल्याचे जाणवले. याबाबत नागरिकांनी प्रशासनास माहिती कळवली आहे. यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच या परिसरात भूकंपमापन यंत्र बसवून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार पंकज पवार यांनी या गावांना भेटी देत ग्रामस्थांची चर्चा केली.

तालुक्यातील वनारवाडी, मडकीजामसह दहा गावांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याबाबत मेरी येथील केंद्राकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार गावांना भेटी देऊन पाहणी केली. कोणत्याही प्रकारची मनुष्य, वित्तहानी झालेली नाही. नागरीकांनी घाबरून जाउ नये.
-पंकज पवार, तहसिलदार, दिंडोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -