कर्जाच्या आमिषाने लाखाला गंडा

एक लाख ९ हजार ९०५ रुपयांना ऑनलाईन गंडा

Hackers exploit coronavirus lockdown with fake Netflix and Disney+ pages

 बजाज फायनान्सचे बनावट ओळखपत्राव्दारे विश्वास संपादन करुन हायटे चोरट्याने एकाला एक लाख ९ हजार ९०५ रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिलींद खरात यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पर्सनल लोन मिळवण्यासाठी ईगुनु वाय. सी. एम. ओ. यु. सेल आर्टिलरी सेंटर रोड येथील मिलींद खरात यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. ९ जून ते १२ जून २०२१ या कालावधीत अनोळखी व्यक्तींनी खरात यांच्याशी संपर्क साधला. अनोळखी व्यक्तीने मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅपवरुन बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवले. अनोळखी व्यक्तीने बजाज फायनान्सचे बनावट ओळखपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. लोन देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग व इतर शुल्काच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने त्यांच्या बॅक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्याआधारे अनोळखी व्यक्तीने एक लाख ९ हजार ९०५ रुपये गायब केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.