घरक्राइमफ्लॅटचे डिपॉझिट देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन लाखाला गंडा

फ्लॅटचे डिपॉझिट देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन लाखाला गंडा

Subscribe

फ्लॅटचे डिपॉझिट देण्याच्या बहाण्याने एकाने महिलेचे तब्बल एक लाख १० हजार रुपये ऑनलाईन पेटीएम क्युआर कोड, फोन पे व गुगल पे व्दारे गायब केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अनिल कुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित अनिल कुमार याने महिलेचे नातेवाईक संजीव पाटील यांच्या फ्लॅटचे डिपॉझिट द्यायचे आहे, असे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. संशयिताने महिलेस वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने पेटीएम क्युआर कोड, गुगल पे व फोन पे वर पैसे टाकण्यास सांगितले. त्यानुसार संशयिताने महिलेसह तिच्या दोन मैत्रिणींना एक लाख १० हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -