Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण

मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्गाची लाट पुन्हा एकदा पसरली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. अनेक नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना लागण झाली आहे. छगन भुजबळ यांच्या उपस्थित काल नाशिक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही छगन भुजबळ यांनी बैठक घेतली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कालच आमदार सरोज आहेर यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. भुजबळ यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. छगन भुजबळ कोरोनावर उपचार घेण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करत दिली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे मंत्री भुजबळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

आमदार सरोज आहेर यांच्या लग्नाला होते हजर

- Advertisement -

एका आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यापैकी भुजबळ हे पाचवे मंत्री आहेत. काल आमदार सरोज आहेर यांच्या विवाह सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. आमदार सरोज आहेर यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार नाशिकमध्ये होते. शरद पवारांना हॅलिपॅडवरुन आणण्यासाठी तसेच त्यांना सोडण्यासाठी भुजबळ गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या लग्न सोहळ्यात उपस्थिती होती. मंत्री भुजबळ यांनी काल दिवसभरात अनेक बैठका घेतल्या संमेलनाच्या बैठकाही घेतल्या यामध्ये छगन भुजबळ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले आहेत. मंत्री भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये आता प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

 

- Advertisement -