घरमहाराष्ट्रनाशिकमोबाईलवर चित्रण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मोबाईलवर चित्रण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

नाशिकरोड येथील जेलरोड परीसरात परीक्षेचा पेपर देऊन सायकल वरुन घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत सैलानी बाबा चौकात तिला धमकावून रिक्षात बसवून दसक पुलाजवळील एकांतात नेत मारहाण करत मोबाईलवर चित्रण करून व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली.

नाशिकरोड येथील जेलरोड परीसरात परीक्षेचा पेपर देऊन सायकल वरुन घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत सैलानी बाबा चौकात तिला धमकावून रिक्षात बसवून दसक पुलाजवळील एकांतात नेत मारहाण करत मोबाईलवर चित्रण करून व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सोअंंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दोनच दिवसांपूर्वी रिक्षाचालकांकडून झालेले सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकरोड भागात बुधवारी सकाळी पुन्हा एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला मारहाण करत मोबाईलवर काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधावारी सकाळी अकराच्या सुमारास महाविद्यालयातील ११ वीचा पेपर देऊन सायकलवरून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा अनिल उर्फ सोनू माणिक शिंदे (एम. एच.१५ एफ.यू. १८४४) याने जेलरोड पाण्याच्या टाकीपासून सैलानी बाबा चौकापर्यंत पाठलाग केला.

- Advertisement -

सैलानी बाबा चौकात मु्लीला रिक्षा आडवी लावत धमकावत रिक्षात बसवून तिला दसक येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या एकांतात आडरस्त्याने आडोशाला नेऊन तिच्याशी अंगलट करत मारहाणही केली. यावेळी अनिलने मुलीला मारहाण करत कपडे काढायला लावून अर्धनग्न फोटो काढले व हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला.
यावेळी मुलीने विरोध केला व आरडाओरडा केल्यानंतर अनिलने तिला मारहाण करत ‘तू आरडाओरडा केला तर तुझे नग्न फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरलेली होती. तिने आपल्या पालकांना कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तातडीने तपास करत अनिल शिंदे यास ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात अनिलविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक मनिषा राऊत करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -