घरमहाराष्ट्रनाशिकमिरजकर सराफ प्रकरण; मुख्य सूत्रधार नाईक फरार घोषित

मिरजकर सराफ प्रकरण; मुख्य सूत्रधार नाईक फरार घोषित

Subscribe

शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणारा मुख्य सुत्रधार हर्षल नाईक याला न्यायालयाने फरार घोषीत केले

आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणारा मुख्य सुत्रधार हर्षल नाईक पोलिसाच्या हाती लागलेला नाही. तो मिरजकर सराफ व मिश्रा जेम्सच्या कंपनीचा संचालक आहे. तो सापडत नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयास सादर केला. शनिवारी (ता.२०) न्यायालयाने  हर्षल नाईक याला न्यायालयाने फरार घोषित केले. तो सापडत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जुलै २०१८ मध्ये हा घोटाळा बाहेर आला. मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रूपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली. या गुन्ह्यामधील फरार संशयितांपैकी आशितोष चंदात्रे यास पोलिसांनी अटक केली. संशयित महेश मिरजकर, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, विशाल नगरकर, विजयदिप पवार, प्राजक्ता कुलकर्णी, किर्ती नाईक यांनी तात्पुरता अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला. मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी त्यांना १५ कोटी रूपये न्यायालयात भरण्याचे आदेश ३० ऑक्टोबर २०१८ रोजी दिले. जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार्‍यांना या संशयित अर्जदारांना न्यायालयाने ही अट टाकली. मात्र, संशयितांनी पैसे भरले नसल्याने ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.

- Advertisement -

मुख्य सुत्रधार हर्षल नाईक गुन्हा उघडकीस येण्यापुर्वीच गायब झाला आहे. २०१८ मध्ये त्याचा परभणी जिल्ह्यात ठावठिकाला आढळून आला होता. मुख्य सुत्रधारच सापडत नसल्याने या गुन्ह्यात तपास पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचा शोध घेऊन शेवटी पोलीस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार शनिवारी (ता.२०) न्यायालयाने नाईक याला फरार घोषित करण्याबाबतची नोटीस जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -