घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदुर्गा पतसंस्थेत पावणेतीन कोटींचा गैरव्यवहार

दुर्गा पतसंस्थेत पावणेतीन कोटींचा गैरव्यवहार

Subscribe

आडगाव येथील दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेत पावणेतीन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखा परिक्षणातून उघडकीस आले आहे. अनियमित कर्ज पुरवठा, संस्थेच्या नावाने कर्ज काढून रकमेचा गैरव्यवहार, ठेव रक्कम प्रत्यक्ष देणे, बनावट बचत खात्यातून परस्पर काढणे आदी आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी लेखापरिक्षक संजय लोळगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष मल्हारी मते यांच्यासह संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत दुर्गा पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे लेखापरिक्षणातून समोर आले आहे. दुर्गा पतसंस्थेचे अध्यक्ष मल्हारी भागूजी मते व अन्य १५, व्यवस्थापक बाजीराव कोल्हे व ५ जण, ओशियन बेवरेजेस प्रा. लि.चे अध्यक्ष बाबूराव बगाडे व २९ आणि माजी शाखा व्यवस्थापक भागिरथ मते व अन्य ९ जणांनी २ कोटी ७६ लाख १ हजार ४० रुपयांचा घोटाळा केला आहे. संशयितांनी बोगस नावाने बचत खाते उघडून त्यातून रक्कम काढली . पतसंस्थेतच संस्थेच्या नावाने कर्ज उचलून कर्ज खात्यातील रकमेचा गैरव्यवहार करण्यात आला. हा घोटाळा आजी व माजी संचालक मंडळ, व्यवस्थापक ते बचत प्रतिनिधी, कर्जदार, ठेवीदार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या माध्यमातून झाला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गवळी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -