Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नाशिकसाठी उदासिनतेचे धोरण परंतु वजनदार मंत्र्यांच्या जिल्हात मुबलक रेमडेसिवीरचा पुरवठा - गिरीश...

नाशिकसाठी उदासिनतेचे धोरण परंतु वजनदार मंत्र्यांच्या जिल्हात मुबलक रेमडेसिवीरचा पुरवठा – गिरीश महाजन

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण दगावत असल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजप आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच जिल्हा रुग्णलयाला देखील भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही आहे. राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठाही ५० टक्के केला असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. नाशिकसाठी राज्य सरकारद्वारे उदासिनतेचे धोरण आहे. परंतु वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात मुबलक रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात आहे आसा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

भाजप आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्यवरुन दुजाभाव करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. दरम्या गिरीश महाजन यांननी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहरात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त असूनही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही, जिल्ह्याला १२० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु राज्य सरकार ५० टक्के ऑक्सिजन पुरवठा करत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी रुग्णांची धावपळ सुरु आहे. रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला की नातेवाईकांना सांगतात कुठेही जा आमच्याकडे ऑक्सिजन पुरवठा नाही. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात करावे. नाशिक जिल्ह्याला सर्वात जास्त गरज आहे. राज्य सरकारमधील वजनदार मंत्र्यांच्या शहरात जास्त ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. लोक अक्षरशा विणवण्या करत आहेत परंतु त्यांने रेमडेसीवीर मिळत नाही आहे. रुग्णाला दाखल करण्यापुर्वीच डॉक्टर सांगतात रेमडेसिवीर घेऊन या, ऑक्सिजन संपल्यास आमची जबाबदारी नाही. महानगरपालिकेने साडे तीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. यामुळे काही दिवसाचा दिलासा मिळाला आहे. नाशिक शासकीय रुग्णालयाला भेट दिली तिथे १५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांना भेटून परिस्थितीबाबत माहिती घेतली या रुग्णालयात तर रेमडेसिवीरच नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच ऑक्सिजनची व्यवस्थाही नसल्याचे स्थिती असल्याचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -