घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य शिबिराला पैसे न दिल्यानेच कापले तिकिट

आरोग्य शिबिराला पैसे न दिल्यानेच कापले तिकिट

Subscribe

शासनाने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्विय सहायकाने आपल्याकडे २५ लाख रूपयांची मागणी केली. मात्र शिबीरासाठी पैसे न दिल्याने आपले तिकिट कापण्यात आल्याचा गंभीर आरोप करत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिकेची झोड उठवली. तर भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना लाखोंच्या मतांनी पराभुत करण्याचा इशाराही दिला.

शासनाने आरोग्य शिबीराचे आयोजन केलेले असतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्विय सहायकाने आपल्याकडे २५ लाख रूपयांची मागणी केली. मात्र शिबिरासाठी पैसे न दिल्याने आपले तिकिट कापण्यात आल्याचा गंभीर आरोप करत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिकेची झोड उठवली. तर भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना लाखोंच्या मतांनी पराभुत करण्याचा इशाराही दिला.

खासदार चव्हाण यांनी येथील मोतीबागमध्ये शुक्रवारी (२९ मार्च) झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात पालकमंत्री गिरीश महाजनांवर टिकेचे झोड उठवली. विद्यमान खासदार चव्हाण यांचे तिकीट यावेळी पक्षाने कापून राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी बहाल केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले चव्हाण यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांचेसह समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर समर्थकांचा मेळावा झाला. चव्हाण म्हणाले, माझी नाराजी पक्षावर नसून पालकमंत्री गिरीश महाजनांवर आहे. आरोग्य शिबीराला पैसे दिले नाही म्हणून माझी उमेदवारी कापण्यात आली. काही चमच्यांकडून सर्वे करून घेत वरिष्ठांची दिशाभुल केली गेल्याचा आरोप त्यांनी केला.महाजन गेल्या साडेचार वर्षात सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी आदिवासी तालुक्यात फिरकले देखील नाही. त्यांना जिल्हा काय समजतो. पैसे दिले नाही म्हणून मॅनेज सर्वे तयार करून भाजपचे नुकसान केल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. आदिवासी समाज प्रचंड संतप्त झाला असून येत्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांना लाखोच्या मतांनी पराभुत करणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

पक्षात काही जणांचे टोळके आहे, तेच चूकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे, यासाठी करोडो रूपये मिळत होते. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आदिवासींच्या बाजूने उभा राहिलो. जे योग्य नाही त्यास विरोध केला. तीन वेळा निवडून देखील मंत्रीपद मिळाले नाही. तरीही कधीच नाराज नव्हतो असे सांगत पुढील दोन तीन दिवसात तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करुन निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चव्हाण जो निर्णय घेतील तो मान्य राहील, असे सांगून समर्थकांनी पाठिंबा व्यक्त दिला. मेळाव्यास पोपटराव आहिरे, दिंडोरी भाजपा तालुका अध्यक्ष संजय बाबळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर चव्हाण, जि प सदस्या सौ कलावती चव्हाण, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कळवण नगर परिषद चे नगरसेवक, अ‍ॅड मनोज शिंदे, माजी नगराध्यक्ष सौ लहरे, सुरगाणा तालुका अध्यक्ष रमेश थोरात,अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव, विजू कानडे, जगदीश होळकर , यांच्या सह अनेक गावचे सरपंच, सदस्य, सुरगाणा नगर परिषद सर्व नगरसेवक, जि. प सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, पंचायत समिती सभापती, सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्तेव्यासपीठावर निफाड, पेठ, दिंडोरी, येवला, सटाणा, मनमाड आदी ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते.

सप्सेंस कायम

चव्हाण हे अपक्ष उमेदवारी करणार, कुणाला पाठींबा देणार की तटस्थ रहातात, या विषयी उत्सुकता कायम आहे. यावेळी चव्हाण जो निर्णय घेतील तो मान्य राहील असे सांगून समर्थकांनी पाठिंबा व्यक्त केला.

- Advertisement -

गावित-चव्हाण एकत्र आल्यास एजंट राहणार नाही

माकपचे उपसभापती इंद्रजित गावित म्हणाले, येथे पक्षाच्यावतीने नव्हे तर एक आदिवासी म्हणून आलो आहे. तूम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला मदत करू, असे म्हणणार नाही. मात्र, खासदार चव्हाण व आमदार गावित यावर चर्चा करू शकतात. यावर चव्हाण यांनी दोघे एकत्र आलो तर, एकही एजंट रहाणार नाही, असे सांगितले. यावर एकच हशा पिकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -