Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मनसेचा साईबाबा मंदिरात घंटानाद

मनसेचा साईबाबा मंदिरात घंटानाद

मनसेने सातपूर येथील साईबाबा मंदिरात घंटानाद आंदोलन करत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त केला

Related Story

- Advertisement -

मंदिरे उघडण्यासाठी मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून शुक्रवारी मनसेने सातपूर येथील साईबाबा मंदिरात घंटानाद आंदोलन करत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त केला.आनंद छाया येथील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले व साईबाबांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे. राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता देतांना राज्यातील विविध आस्थापना, मॉल, दुकाने व सार्वजनिक ठिकाणे, राजकीय पक्षांच्या यात्रा व राजकीय मेळावे सुरु आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार मंदिरे बंद ठेवून हिंदू बांधवांच्या आस्थेवर बंदी आणू इच्छित आहे. या धोरणाचा मनसेकडून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मनसेचे नगरसेवक सलीम शेख, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, विजय अहिरे, शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -