Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मनसेची मोठी घोषणा! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार

मनसेची मोठी घोषणा! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार

Related Story

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मनसेने अजून एक मोठी घोषणा केली आहे. मनसे आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे कशा पद्धतीने निवडणुकीच्या मैदानात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मनसे आगामी महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून राजकीय दौरे करत आहेत. दरम्यान, राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. तर अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आज नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं देशपांडे म्हणाले.

मनसेने दिला इशारा

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. पाहणी करत असताना काही ठिकाणी या प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे मनसेच्या काळातील या प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करण्या यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांना केली आहे. पालिकेच्या इंजीनिअर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

- Advertisement -