घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोडला लुडोचा खेळ पडला महागात; कवडी उडवल्याच्या रागातून हल्ला

नाशिकरोडला लुडोचा खेळ पडला महागात; कवडी उडवल्याच्या रागातून हल्ला

Subscribe

लुडो खेळत असताना त्याची कवडी  का उडवली या किरकोळ कारणावरून वाद होऊन एकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केल्याची घटना वडनेर दुमाला गावातील सावरकर चौकात घडली.

लुडो खेळत असताना त्याची कवडी  का उडवली या किरकोळ कारणावरून वाद होऊन एकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केल्याची घटना वडनेर दुमाला गावातील सावरकर चौकात घडली. संशयित हल्लेखोर फरार असून उपनगर पोलीस तपास करत आहेत.

नाशिकरोड परिसरात असलेल्या वडनेर दुमाला गावात रविवारी, २७ जानेवारीला दुपारी सावरकर चौकात योगेश चांगदेव भागवत (२२) व श्याम रामचंद्र पोरजे (३५) हे दोघे मोबाईलवर लुडो गेम खेळत असताना योगेश भागवत याने श्याम पोरजेची कवडी उडवली. या रागातून दोघांत बाचाबाची झाली. या वेळी श्यामने जवळच पडलेल्या लोखंडी वस्तूने योगेशच्या डोक्यात वार केला. त्यात योगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, श्याम पोरजे फरार असून, उपनगर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -