घरताज्या घडामोडीराज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आरोप करत टोळक्याचा राडा

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आरोप करत टोळक्याचा राडा

Subscribe

हनुमानवाडी येथील घटना

राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे बच्चू कडू व अनिल भडांगे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत सातजणांच्या टोळक्याने भडांगे यांना शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.१७) रात्री ९.३० वाजेदरम्यान हनुमानवाडीच्या कोपर्‍यावर घडली. याप्रकरणी अनिल कोंडाजी भडांगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अभियंता शरद पवार (रा. ठक्कर बाजार, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडीच्या कोपर्‍यावर अनिल भडांगे व त्यांचे मित्र वैभव देशमुख, जगन काकडे गप्पा मारत उभे होते. त्यावेळी भडांगे यांच्याजवळ चारचाकी वाहनातून शरद पवार व त्यांच्या सोबत अनोळखी सातजण टोळक्याने आले. राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे बच्चू कडू व भडांगे यांच्यावर वेगवेगळे आरोप करुन शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर भडांगे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन बळजबरीने काढून घेतले सातजण फरार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक साखरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -