घरमहाराष्ट्रनाशिककाळाराम मंदिरात अतिरेकी हल्ल्याचा थरार

काळाराम मंदिरात अतिरेकी हल्ल्याचा थरार

Subscribe

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडुन मॉकड्रिल; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

काळाराम मंदिरात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील कमांडोंसह पोलीस तात्काळ घेराव घालतात. पोलीस अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या भाविकांची सुखरुप सुटका करत तिघांना कंठस्थान घालतात. काही वेळानंतर भाविकांसह परिसरातील नागरिकांना हल्ला नसून पोलिसांच्या सराव असल्याचे समजल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

काळाराम मंदिर सत्याग्रह दिनाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर सत्याग्रहात शहीद झालेल्या आंबेडकरवादी चळवळीच्या भिमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी शहर आणि जिल्ह्यातून हजारो अनुयायी येतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वमीवर गर्दी टाळण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून सोमवारी (दि.१) दुपारी चार वाजेच्या सुमारास काळाराम मंदिर परिसरासह पंचवटीत मॉकड्रिल करण्यात आले. मॉकड्रीलमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विशेष शाखा सहायक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, वाहतूक शाखेचे गायकवाड, प्रदीप जाधव यांच्यासह पोलीस पथक बॉम्ब शोधक व नाशक पथक पोलीस कृतीदल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हा शोध पथक असे एकूण दीडशे ते दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

पोलिसांनी सुरुवातीला मंदिर परिसर मोकळा केला. त्यानंतर मंदिरात लपलेल्या तीन अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना घेराव घालत त्यांना शरण येण्याची विनवणी केली. तरीही, अतिरेकी पोलिसांच्या दिशेने बेछूटपणे गोळीबार सुरूच ठेवतात. अखेर पोलीस त्यांना प्रत्युत्तर देतात. तब्बल एक तास चाललेल्या कारवाईत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात येते. त्यानंतर पोलीस अतिरेक्यांनी आणलेला शस्त्रसाठा स्फोटके यांचा शोध घेऊन ते जप्त करून नष्ट करतात.

यावेळी पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, सहायक निरीक्षक विशाल गिरी, महिला सहायक निरीक्षक गवळी, उपनिरीक्षक योगेश माळी, कासर्ले, गुन्हे शोध पथक व कर्मचारी काळाराम मंदिराच्या आवारात सज्ज होते. म्हसरूळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणेंसह पथक रामकुंड परिसरात होते. तर आडगावचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख पथकासह काट्या मारुती पोलीस चौकी चौकात नाकाबंदी करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -