घरमहाराष्ट्रनाशिकबिबट्याला पकडण्यासाठी मॉक ड्रील

बिबट्याला पकडण्यासाठी मॉक ड्रील

Subscribe

पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचे सल्ल्याने शास्त्रोक्त पद्धतीने रेस्क्यु

घरात किंवा शेतातील पडवीत गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्याचे मॉक ड्रील करंजगाव येथे नुकतेच करण्यात आले. पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचे सल्ल्याने शास्त्रोक्त पद्धतीने जखमी डमी बिबट्यास ट्रेन्क्युलायजेशन गनव्दारे एका घरातून रेस्क्यु करण्यात आले.

जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत वन्यप्राणी व मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी बिबट प्रवण संवेदनशील गावांमध्ये वनविभाग, पोलीस विभाग यांचे संयुक्त प्रात्यक्षिक आयोजित करुन स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांना माहिती देण्यात यावी, असे ठरविण्यात आले. त्यानुसार मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पूर्व भाग नाशिक वनविभाग यांचे वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे मॉक ड्रील आयोजित करण्यात आले. मानवीवस्तीत बिबट्या दिसल्यानंतर किंवा गावात शिरल्यानंतर होणारा संघर्ष टाळणे, बिबटचा बचाव करणे, यासाठी वनविभागास आटोकाट प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मानवी हस्तक्षेप थांबविणे व कायदा, सुव्यवस्था राखणेसाठी पोलिस प्रशासनाची मदत आवश्यक असते. त्यानुसार आधुनिक बचाव पथक, सायखेडा व निफाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करंजगावात दाखल झाले. बिबट्या घरात शिरल्यानंतर काय करावे लागते, प्रत्येकाची भूमिका काय असते, नागरीकांची जबाबदारी काय असावी, याबाबत सहाय्यक वनसंरक्षक मनमाड डॉ. सुजित नेवसे यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर सराव प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी करंजगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -