१० वर्षांच्या गतीमंद मुलीचा विनयभंग; मावस काकाला अटक

मावस काकाने १० वर्षांच्या गतीमंद मुलीला घराबाहेर तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी 43 वर्षीय मावस काकाला याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर, सातपूर येथील मावस काकाने रविवारी (दि.२७) गतीमंद मुलीला घराबाहेर नेले. त्याने तिच्या विनयभंग केला. ही बाब ती घरी आल्यावर कुटुंबियांच्या लक्षात आली. याप्रकरणी कुटुंबियांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मावस काकाला अटक केली. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.