घरमहाराष्ट्रनाशिकती आली... अन् बछड्यांना घेऊन गेली!

ती आली… अन् बछड्यांना घेऊन गेली!

Subscribe

ताटातूट झालेल्या बछड्यांना आई मिळाली...

आईपासून ताटातूट झालेले बिबट्याचे दोन बछडे आईला पुन्हा भेटण्यासाठी आसुसलेल्या नरजेने वनविभागाच्या अधिकार्‍यांकडे पाहत होते… आईशिवाय हे बछडे जगणे शक्य नसल्यामुळे वनविभागानेही त्यांची भेट घडवून आणण्याचे ठरवले… त्यांना क्रेटमध्ये ठेवून क्रेट त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी ठेवला… रात्री त्यांची आई आली आणि दोघा बछड्यांना घेवून गेली… ताटातूट झालेल्या बछड्यांना त्यांची आई मिळाल्याने सगळ्यांनीच समाधान व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी चिराई येथील भास्कर अहिरे यांच्या शेतात घडलेली ही हृदयस्पर्शी कहाणी. बिबट्याची मादी आणि तिच्या दोन बछड्यांची भेट घडवून आणण्याचा वनाधिकार्‍यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अहिरे यांच्या शेतातील विहिरीत दहा दिवसांचे दोन बछडे पडले होते. त्यांना सुखरूप काढण्यात वनविभागाला यश आले. मात्र, त्यांची आई बाळांसाठी आक्रोश करत होती. अशावेळी वनविभाग कर्मचारी बछड्यांच्या आईसाठी वनविभाग तळ ठोकून होते. अशावेळी मादी बिबट्या आणि तिचे बछडे यांची ताटातूट होऊ नये, यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आणि आईपासून दुरावलेल्या बछड्यांचं व्यवस्थित संगोपन करुन त्यांचं रक्षण केले. एक बछडे नर तर एक मादी होते.

- Advertisement -

वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. कांबळे, वनपाल के. आर. बोरसे, रुपेश दुसाने, पंकज परदेशी, प्रशांत खैरणार, के, एम, अहिरे, ए. डी. हेमांडे, एम. डी. भदाणे, एस. पी. चौरे, जी. के. अहिरे, बी. जी. सोनवणे, एम. एन. मोरे, एस. बी. मरशिवणे आदींच्या पथकाने या बछड्यांची आणि मादीची पुन्हा घडवून आणण्याचे ठरवले. यानुसार मूळ ठिकाणी बछडे क्रेटमध्ये ठेवले. बछड्यासाठी व्याकुळ मादी बिबट्या अखेर शोध घेत शुक्रवारी रात्री अकराला क्रेटजवळ आली आणि आपल्या दोनही बछड्यांना सुखरुपपणे घेऊन ती निघून गेली. ताटतूट झालेल्या या मायलेकरांची पुन्हा भेट घडवून आणल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी वन विभागाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -