Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक पोटच्या मुलीला दिले कुत्र्यांच्या तोंडी, मातेला बेड्या

पोटच्या मुलीला दिले कुत्र्यांच्या तोंडी, मातेला बेड्या

देवळा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली महिलाच निघाली वैरी

Related Story

- Advertisement -

तालुक्यातील वासोळ येथे दोन दिवसांपूर्वी नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला कपड्यांमध्ये गुंडाळून बेवारसपणे फेकून पसार झालेल्या निर्दयी मातेचा अखेर शोध लागला. अनैतिक प्रेमसंबंधातून मुलीचा जन्म झाला. त्यानंतर समाजात आपली बदनामी होईल, या भीतीमुळे या कुमारी मातेने नुकत्याच जन्मलेल्या नकोशीला बेवारसपणे फेकून दिल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. देवळा पोलिसांनी संशयित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासोळ (ता. देवळा) येथील आदिवासी वस्तीतील मोडक्या झोपडीजवळ नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक बेवारसपणे फेकून दिल्याची घटना सोमवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली होती. भूकेने व्याकूळ झालेले हे लहान अर्भक रात्रभर थंडीत हंबरडा फोडत होते. बाळाची नाळही तशीच होती. बाळाच्या रडण्यामुळे तेथील नागरिकांचे लक्ष गेल्याने बाळाचे प्राण वाचले. मात्र, कुत्र्यांनी त्याच्या डाव्या पायाच्या पंजाचे लचके तोडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती पोलीस पाटील कैलास खैरनार व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या अर्भकाला वासोळ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचारासाठी आणले तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेमुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

देवळा पोलीस या मातेचा शोध घेत असतानाच आज अखेर तिचा शोध लागला. वासोळ येथीलच असलेल्या या अविवाहित महिलेच्या पोटी अनैतिक प्रेमसंबंधातून स्त्री जातीचे अर्भक जन्माला आले. मात्र या मातृत्वाबाबत समाज आपल्याला विचारणा करेल, या विचाराने या महिलेने हे बाळ आदिवासी वस्तीतील मोडक्या झोपडीजवळ फेकून फरार झाल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी त्या निर्दयी कुमारी मातेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिची डीएनएची चाचणी केली जाणार आहे.

याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाळू पवार, प्रकाश सोनवणे, सुरेश कोरडे आदी करत आहेत.

- Advertisement -