घरमहाराष्ट्रनाशिकखासदार चव्हाणांचे आव्हान संपुष्टात

खासदार चव्हाणांचे आव्हान संपुष्टात

Subscribe

दिंडोरी मतदारसंघातील तिकीट कापल्याने नाराज असलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची सद्दी संपुष्टात येणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी कायम असताना दुसरीकडे, दिंडोरी मतदारसंघातील तिकीट कापल्याने नाराज असलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची सद्दी संपुष्टात येणार आहे. त्यांनी ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज घेतला आणि अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्जच न भरल्यामुळे गेली १५ वर्षांपासूनची त्यांची खासदारकी आता संपल्यात जमा आहे. भाजपने या बंडोबांना थंड करण्यात यश मिळवले खरे, पण युतीधर्म ते पाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दिंडोरी मतदारसंघातील बंड करण्याच्या तयारीत असलेले चव्हाण यांनी उमेदवारीचे हत्यार म्यान करून साधा अर्जही भरण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे गेली १५ वर्ष मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखणारे आणि मोदी लाटेशिवाय निवडणूक जिंकणारे खासदार चव्हाण आता दिल्लीपासून दुरावले आहेत. त्यांनी आठ दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र, कोणत्या पक्षाकडून तो भरायचा याविषयी गोंधळ अखेरपर्यंत न मिटल्यामुळे त्यांना राजकीय वाट सापडली नाही. अपक्ष उमेदवार म्हणून खड्ड्यात उडी मारण्यापेक्षा थांबलेले बरे म्हणून त्यांनी आपली उमेदवारी रद्द केली. तथापि, त्यासाठी भाजपातील प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठांकडून चव्हाण यांची संपर्क नेत्यांच्या माध्यमातून मनधरणी करण्यात आली. चर्चा पूर्ण होऊन चव्हाण भूमिका मांडतील, असे सांगितले जात आहे. यास पालकमंत्री महाजन यांनीही दुजोरा दिला आहे. चव्हाण यांच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगत, ते पक्षाचे काम करतील, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या पदरात नेमके काय पडते याकडे आता लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भाजपला पाठिंबा की विरोध

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नसल्यामुळे युतीच्या उमेदवारांना बंडखोरीचे आव्हान राहिलेले नाही. तसेच दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी युतीला पाठिंबा दिल्यामुळे डॉ.भारती पवार यांचे मनोबल उंचावले आहे. मात्र, खासदार चव्हाण यांचे तिकीट कापल्यामुळे ते युतीधर्म पाळणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -