घरताज्या घडामोडीखासदार डॉ.भारती पवारांनी घेतले ‘त्या’ समाधींचे दर्शन

खासदार डॉ.भारती पवारांनी घेतले ‘त्या’ समाधींचे दर्शन

Subscribe

नाशिक : पालघर येथे झुंडबळी ठरलेले पंचदशनाम आखाड्याचे स्वामी कल्पवृक्ष आणि स्वामी सुशीलगिरी यांच्या समाधीचे दर्शन दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी घेतले. पंचदशनाम जुना आखाड्याचे त्र्यंबकेश्वर येथील ठाणापती स्वामी विष्णूगिरी महाराज व अन्य संतांची मठात सांत्वनपर भेट घेतली.   या संदर्भात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी देखील भ्रमणध्वनी वरून सांत्वनपर विचारपूस केली. दक्षिणमुखी हनुमान मंदिर मठात जेथे स्वामी कल्पवृक्षगिरी व स्वामी सुशीलगिरी यांचे वास्तव्य होते तिथेच या दोन्ही महंतांना समाधी देण्यात आली असून त्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धासुमन अर्पित केले. यावेळी भाजप चिटणीस लक्ष्मण सावजी, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष विष्णू दोभाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, पंकज धारणे, तेजस ढेरगे, सागर गमे उपस्थित होते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -