घरताज्या घडामोडीएमपीएससी: राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित

एमपीएससी: राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित

Subscribe

नाशिक : ‘एमपीएससी’तर्फे 26 एप्रिल व 10 मे रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा तुर्त स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सुधारित वेळापत्रक परीक्षार्थींना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे. करोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 तारखेपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थिती अजून गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. लॉकडाऊनचा कालावधी हा उन्हाळी सुटी म्हणून घोषित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत एमपीएससीने दि.26 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा व दि.10 मे रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश कळवण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थींना एसएमएसद्वारे या परीक्षांची तारीख अवगत केली जाईल, असे आयोगाने दि.7 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -