लाचखोर महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ गजाआड

bribe

शेतीसाठी विजेचे ट्रान्सफार्मर बसविण्याचे कोटेशन मंजूर करण्यासासाठी तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्विकारतना महावितरणचे मनमाड उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मनमाडमध्ये अटक केली. भगवान भाऊसाहेब गायकवाड असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदारांच्या नातेवाईकांनी शेतीसाठी विजेचे ट्रान्सफार्मर बसविण्याचे कोटेशन महावितरण मनमाड उपविभाग कार्यालयात दाखल केले होते. कोटेशन मंजूर करण्यासाठी २ हजार रुपये आणि ट्रान्सफार्मर बसविल्यानंतर ५ हजार रुपये असे एकूण ७ हजार रुपयांची लाच भगवान गायकवाड यांनी मंगळवारी (दि.२९) तक्रारदाराकडे मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. बुधवारी (दि.३०) मनमाड येथील सराकर अ‍ॅटो इलेक्ट्रीक दुकानासमोर मनमाड चांदवड रोडवर तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने अटक केली.