घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत पॅसेंजर २३ एप्रिलपर्यंत बंद

मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत पॅसेंजर २३ एप्रिलपर्यंत बंद

Subscribe

मुंबई-भुसावळ आणि भुसावळ-सूरत पॅसेंजर रेल्वेगाड्या १ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई-भुसावळ आणि भुसावळ-सूरत पॅसेंजर रेल्वेगाड्या १ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-भादली सेक्शन दरम्यान नवीन तिसर्‍या रेल्वे मार्गाचे तसेच नॉन इंटर लॉकिंगचे काम रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार असून, २३ एप्रिलपर्यंत या मार्गावरील मुंबई व सुरतकडे जाणार्‍या व येणार्‍या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड़ी क्रमांक ५११५४ अप भुसावळ -मुंबई पॅसेंजर ही गाडी १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक ५११५३ डाऊन मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गाडीदेखील १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक ५९०७६ अप आणि ५९०७५ डाऊन सुरत-भुसावळ तसेच गाड़ी क्रमांक ५९०७८ अप आणि ५९०७७ डाऊन भुसावळ-सुरत पॅसेंजर या गाड्याही १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत धावणार नाहीत. कल्याण ते इगतपुरी दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाइनचे काम झाले आहे. इगतपुरी ते भुसावळपर्यंत काम सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -