सिडकोत धारदार हत्याराने युवकाचा खून

उपेंद्रनगर येथे राहणार्‍या वैभव विजय गांडुळे या युवकाचा शुभम पार्क परिसरात भरदिवसा धारदार हत्याराने खून करण्यात आला. वैभव विजय गांडुळे महाविद्यालयीन युवक होता..

Cidco_Murder
सिडकोतील तरुणाचा खून

उपेंद्रनगर येथे राहणार्‍या वैभव विजय गांडुळे या युवकाचा शुभम पार्क परिसरात भरदिवसा धारदार हत्याराने खून करण्यात आला. वैभव विजय गांडुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

मृत तरुण आणि संशयित मारेकरी यांच्यात काही दिवसांपासून भांडण असल्याने पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अंबड वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक विलास जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या खूनाच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.