सराईत गुन्हेगाराचा खून

mumbai crime news Shocking 35 year old man murdered by younger brother

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.२१) तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण गणपत काकड असे खून झालेल्या तरुणाचा नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण काकड याची काही दिवसांपुर्वी कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली होती. त्याचा अनोळखी व्यक्तीने खून केला. ही बाब पोलिसांना समजताच सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी व गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले होते.