अंबडमध्ये धारदार शस्त्राने तरुणाचा खून

missing mother and son death body found in Drain at laldongari chembur
missing mother and son death body found in Drain at laldongari chembur

नाशिक शहरात खून, हाणामारीसह कौटुंबिक हिंसाचार्‍याच्या घटनेत वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगारासह तिघांनी धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.३१) रात्री ९.३० वाजेदरम्यान घडली. खुनाच्या घटनेनंतर सराईत गुन्हेगासह हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. राहुल गवळी (वय २५, रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.