घरताज्या घडामोडीशेतजमिनीच्या वादातून कपाळावर गोळ्या झाडून भावाची हत्या

शेतजमिनीच्या वादातून कपाळावर गोळ्या झाडून भावाची हत्या

Subscribe

शेतजमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची कपाळावर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.७) रात्री सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे घडली. या घटनेत मोठा भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास कुटे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

देविदास कुटे हे वडझिरे ग्रामपंचायतीचे सेवक होते. देविदास कुटे व त्याच्या लहान भावात शेतजमिनीवरुन वाद सुरु होते. लहान भावाने कुटे याच्याकडे जमिनीची मागणी केली होती. त्यातून त्याच्या वाद झाला. मंगळवारी रात्रीच्या लहान भावाने त्याच्या मित्राला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देविदास कुटे यांच्या पत्नीला घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या लहान भावाने देविदास कुटे याच्या कपाळावर गोळी झाडून हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -