घरमहाराष्ट्रनाशिकसराईत गुन्हेगार संजय धामणेची हत्या

सराईत गुन्हेगार संजय धामणेची हत्या

Subscribe

इगतपुरी भागात घडली घडटना, धामणेवर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल

देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे (४५) याची टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेदहा वाजता हत्या झाली. इगतपुरी येथील घरी जात असताना त्याच्यावर हल्ला झाला.

हाती आलेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील संजय धामणे हा शुक्रवारी इगतपुरीतील डाक बंगला येथे राहणाऱ्या दुसऱ्या पत्नीकडे जात असताना टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच ठार झाला. इगतपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरु आहे. सहा वर्षांपुर्वी इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगार डेविड मॅनवेल याचा कल्याण भागात खून झाल्याच्या कारणावरुन संशयित म्हणून राजू धामणे हा तळोजा जेलमध्ये आहे. या खूनाचा बदला म्हणून संजय धामणेचा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. संजय धामणेवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

संशयितांच्या आईने चिथावणी दिल्याची फिर्याद

इगतपुरी पोलीस ठाण्यात दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत, मृत संजय धामणे याचा मोठा भाऊ राजेश बबन धामणे हा डेव्हिड पॅट्रीक मॅनवेल याच्या खूनाच्या आरोपाखाली तळोजा जेलमध्ये आहे. या केसच्या तारखेच्या वेळी राजेश धामणे व पॅट्रीक मॅनवेल यांचे कुटुंबिय आमने सामने येत होते. यावेळी पॅट्रीकची आई इतरांना चिथावणी देऊन संजय धामणेचा जीव घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, असे म्हणून कट रचत होती. त्यातूनच संजय धामणे याची हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात अजय पॅट्रीक मॅनवेल, सायमन उर्फ पापा पॅट्रीक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, राजकुमार भारती, आशा पॅट्रीक मॅनवेल यांच्याविरुद्ध इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक डी. डी. पाटील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -