घरमहाराष्ट्रनाशिककोटबेल येथे वयोवृद्ध शेतकर्‍याचा खून

कोटबेल येथे वयोवृद्ध शेतकर्‍याचा खून

Subscribe

जायखेडा पोलिसांनी संशयिताला केली अटक

सटाणा तालुक्यातील कोटबेल येथील घुबडदरा शिवारात वयोवृद्ध शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार (वय ७७) यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जायखेडा पोलिसांनी याप्रकरणी रात्रीच एका संशयित आरोपीला अटक केली असून, आरोपीने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मयत सहादू खैरनार यांना मुलबाळ नसल्याने ते आपल्या पत्नीसमवेत कोटबेलच्या घुबडदरा शिवारात राहत होते. गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करत धारदार कुर्‍हाडीने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत पळ काढला. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी खैरनार यांच्या घराकडे धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने उपस्थित शेतकर्‍यांनी पोलीसपाटील साहेबराव कांदळकर यांना घटनेची माहिती दिली. कांदळकर यांनी कोणताही विलंब न करता जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना माहिती दिली.

- Advertisement -

त्याचवेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व सहकारी परिसरात रात्र गस्त घालत होते. त्यांनी तात्काळ परिसर पिंजून काढत मुख्य आरोपीस पकडले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी उशिरा मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -