घरमहाराष्ट्रनाशिकतळेगाव दिंडोरीत दगडाने ठेचून तरुणाची हत्या

तळेगाव दिंडोरीत दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Subscribe

मृतदेह झुडपांमध्ये टाकून काढला पळ

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी गावात दीपक जनार्दन जाधव (वय २२) याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. थंडी आणि अंधाराचा फायदा घेत मारेकऱ्याने मृतदेह सार्वजनिक वाचनालयाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडालगत झुडपांमध्ये टाकून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील रोशन परदेशी यांनी दिंडोरी पोलीसांना घटनेची माहिती दिली.

ही माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.हा मृतदेह कुणाचा आहे आणि मारेकरी कोण याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभ ठाकलंय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी आणि दरोड्याच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत वावरताहेत. त्यामुळे निदान आतातरी पोलिसांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवावा अशी मागणी सर्वसामान्यांच्या वतीने होत आहे.

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -