दगडाने ठेचून युवकाचा निर्घुण खून

Murder

जय भवानी रोडवरील फर्नांडिस वाडीतील मोकळ्या जागेत टोळक्याने युवकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून व दगडाने चेहरा ठेचून निर्घुण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रशांत शांताराम वाघ (रा.सातपूर) असे मयत युवकाचे नाव आहे. टोळक्याने वाघ यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.