घरमहाराष्ट्रनाशिकमुथूट दरोडा; बिहारमधून पकडला मुख्य सूत्रधार

मुथूट दरोडा; बिहारमधून पकडला मुख्य सूत्रधार

Subscribe

नाशिकमधील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोड्याचा कट रचणारा आणि संगणक अभियंता साजू सॅम्युअलची हत्या करणारा मुख्य सूत्रधार आकाश विजय बहादूरसिंग राजपूत (३०, रा. रामपूर, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली.

नाशिकमधील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोड्याचा कट रचणारा आणि संगणक अभियंता साजू सॅम्युअलची हत्या करणारा मुख्य सूत्रधार आकाश विजय बहादूरसिंग राजपूत (३०, रा. रामपूर, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेश व बिहारमध्ये ७ गुन्हे दाखल आहेत. दरोड्याचा मास्टरमाइंड सुबोधसिंगचा याचा तो मुख्य हस्तक आहे. विजयने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

१४ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मुथूट फायनान्स कार्यालयावर ६ दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रसंगावधान राखत संगणक अभियंता साजू सॅम्युअलने सायरन वाजवला. त्यामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर सर्व दरोडेखोर फरार झाले. पोलिसांची पथके देशभर दरोडेखोरांच्या शोधार्थ रवाना झाली. २३ जून रोजी पोलिसांनी दरोड्यासाठी सर्व साहित्य पुरवठा करणारा जितेंद्र विजय बहादूरसिंग याला सूरतमधून अटक केली. तर २४ जून रोजी परमेंद्र सिंग याला कडोदरा, गुजरात येथून अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आकाशसिंगने प्रथम गोळीबार केला असून सुबोधसिंगच्या सांगण्यावरून त्याने दरोड्याचा कट रचल्याचे त्याने दोघांनी सांगितले.

- Advertisement -

आकाशसिंग अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. तो आरा (जि.भोजपूर, बिहार) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलीस पटना येथे गेले. दानापूर, राजीवनगर, रूपसपूर पोलीस ठाण्यात जात आकाशसिंगविरोधात गुन्ह्यांची माहिती गोळा केली. दरम्यान, तो त्याची कार (बी.आर. ३१ एस. ५४८८) घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बिहारमध्ये १५ दिवसांपासून तळ ठोकला. तो आरा येथे पेहराव बदलून मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची कार विष्णूनगरमध्ये दिसली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने भिंतीवरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

ऑक्टोबर २०१८ मध्ये रचला दरोड्याचा प्लॅन

मुथूट फायनान्स कार्यालयातील दरोड्याचा मास्टमाइंड कुप्रसिद्ध सुबोधसिंग आणि मनिष सिंगचा होता. त्यांच्या सांगण्यावरून आकाशसिंग व अमन ऊर्फ तिवारी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये नाशिकला येत रेकी केली होती. दरम्यान, अमनचा बिहार एसटीएफने एनकाऊंटर केला. त्यामुळे दरोड्याचा प्लॅन फसला. त्यानंतर सुबोधसिंग व मनिष सिंगच्या सांगण्यावरून आकाशसिंग व साथीदारांनी १४ जून रोजी मुथूट कार्यालयात दरोडा टाकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -