Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक पोलिसांची माणुसकी; बक्षिसाची रक्कम देणार सॅम्युअलच्या कुटुंबियांना

नाशिक पोलिसांची माणुसकी; बक्षिसाची रक्कम देणार सॅम्युअलच्या कुटुंबियांना

दोन आरोपींना पकडणार्‍या तीन पथकांनी बक्षिसाची २ लाख १० हजारांची रक्कम सॅम्युअलच्या कुटुंबियांना मदत म्हणून द्यायचे जाहीर केले.

Related Story

- Advertisement -

मुथूट फायानान्सच्या कार्यालयातील दागिने, रोकडची लूट होऊ, यासाठी स्वता:ची पर्वा न करता साजू सॅम्युअलने (२९, रा.केरळ) सायरन वाजवत दरोडेखोरांशी झटापट केली. त्याच्या आक्रमक पवित्रा पाहून बिथलेल्या दरोडेखोरांनी त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला पण त्याच्याच प्रसंगावधानामुळे मुथूटचे दागिने आणि रोकड वाचली. त्याच्या धाडसाची दखल घेत दोन आरोपींना पकडणार्‍या तीन पथकांनी बक्षिसाची २ लाख १० हजारांची रक्कम सॅम्युअलच्या कुटुंबियांना मदत म्हणून द्यायचे जाहीर केले.

सॅम्युअलच्या प्रसंगावधानामुळे वाचली बँकेची रक्कम

१४ जून रोजी मुथूट फायनान्स कार्यालयात सर्व कर्मचाीरी कामात मग्न असताना दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला. सर्वांचे मोबाईल जप्त करत लॉकर्सच्या चाव्यांची मागणी केली. त्यावेळी प्रसंगावधान राखत साजू सॅम्युअलने सायरन वाजविण्याचे ठरविले. तो पटकन कॅशियरच्या केबिनमध्येआला.बाहेर दरोडेखोर असतानाही त्याने जीवाची पर्वा न करता टेबलखाली जात आपत्कालीन अलार्म वाजविला. त्यामुळे दरोडेखोरांचा प्लॅन फसला. त्यांनी कॅशियरच्या केबिनमध्ये येण्याचा प्रयत्न सुरु केला असता सॅम्युअलने टेबलवरील प्लस्टिक ट्रे ने दरोडेखोरांना मारहाण केली. दरोडेखोरांनी त्याच्याशी झटापट करत त्याला केबिन बाहेर आणले. त्यावेळी पुन्हा आक्रमक होत सॅम्युअलने दरोडेखोरांना प्रतिकार केला. बिथलेले दरोडेखोर परमेंदर सिंग आणि आकाश सिंग यांनी त्याच्यावर पिस्तूलने पाच गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला.

बक्षीस सॅम्युअलच्या कुटुंबाला मदत म्हणून देणार

- Advertisement -

सॅम्युअलमुळे कार्यालयातील सोने आणि रोकड वाचल्याने शहर पोलिसांसह नाशिककरांची त्याने मने जिंकली. सॅम्युअल हा अभियंता होता. मुंबईच्या विभागीय कार्यालयातून नाशिकच्या मुथूट कार्यालयातील यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी सॅम्युअल आला होता. सॅम्युअल विवाहित असून, त्याच्या पश्चात पत्नी आणि सात महिन्यांचे बाळ आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत सूत्रधार आणि सॅम्युअलवर गोळ्या झाडणार्‍या परमेंदर सिंगला अटक केली. पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी पथकांच्या कामगिरीबद्दल तीन पथकांना ७० हजारांचे बक्षीस जाहीर केले. पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बक्षीस सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

मुथूट दरोड्यातील मुख्य सूत्रधाराला अखेर अटक, आंतरराज्य टोळीचा हात

- Advertisement -