घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र निवडणूकित 'काटे की टक्कर'; हे आहेत अंतिम उमेदवार

मविप्र निवडणूकित ‘काटे की टक्कर’; हे आहेत अंतिम उमेदवार

Subscribe

नाशिक : मराठा विद्याप्रसारक शिक्षण समाज संस्थेच्या निवडणुकीने आता जोर पकडला आहे. बहुप्रतिक्षित असलेली सत्ताधारी प्रगती पॅनल आणि विरोधी परिवर्तन पॅनलची उमेदवार यादी आज माघारीच्या शेवटच्या दिवशी माघारीला अगदी अर्धा ते एक तास बाकी असताना जाहीर झाली. संस्थेच्या २४ जागांसाठी तब्बल २९१ अर्ज दाखल झाले होते. यातील माघारीच्या पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी अवघे १५ अर्ज माघारी झाले होते. शुक्रवारी (दि.१९) शेवटच्या दिवशी त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. त्यामुळे सकाळ पासूनच जिल्ह्यभरातील इच्छुक उमेदवार, त्याचे समर्थक, समाजबांधव यांनी संस्थेचं मुख्यालय त्याचसोबत दोन्ही पॅनलचे मुख्यालय असलेल्या पंडित कॉलनी परिसरात मोठी गर्दी केली होती. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे दोन्ही पॅनल प्रमुखांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. त्याचसोबत विरोधी पॅनलमधून कोणाला उमेदवारी दिली आहे त्यानुसार उमेदवार देण्याचेही खेळी साधायची होती. त्यामुळे दोन्ही पॅनलने माघारीची मुदत अगदी अर्धा ते एक तासांवर राहिली असताना आपल्या याद्या जाहीर केल्या.

दरम्यान, दोन्ही पॅनलकडून सर्वच जागांवर तुल्यबळ उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रगती विरुद्ध परिवर्तन ही लढत अत्यंत ‘काटे की टक्कर’ होणार असेच एकंदरीत चित्र आहे. आता या दोन्ही पॅनलचे अधिकृत उमेदवार कमी अवधीत एकोप्याने मतदारांपर्यंत कसे पोहचणार, मतदारांची मने आपल्या बाजूने कशी वळणार, नाराजांची मनधरणी कशी करणार आणि सरतेशेवटी सर्वाधिक मतांच दान आपल्या पदरात कसं पाडून घेणार हे आता प्रचारकाळात दिसून येईलच.

- Advertisement -

:- कसा रंगणार सामना -:

:: प्रगती पॅनल ::
  • अध्यक्ष : डॉ. सुनील उत्तमराव ढिकले
  • सभापती : माणिकराव माधवराव बोरस्ते
  • सरचिटणीस : नीलिमाताई वसंतराव पवार
  • उपाध्यक्ष : दिलीप तुकाराम मोरे
  • उपसभापती : डॉ. विलास केदा बच्छाव
  • चिटणीस : डॉ. प्रशांत पाटील
तालुका सदस्य उमेदवार 

इगतपुरी- भाऊसाहेब खातळे
कळवण – धनंजय पवार
दिंडोरी – सुरेश कळमकर
नाशिक शहर – नानासाहेब महाले
बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे
निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख
नांदगाव- चेतन मनसुखराव पाटील
चांदवड – उत्तमबाबा भालेराव
देवळा – केदाजी तानाजी आहेर
मालेगाव – डॉ. जयंत पवार
सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे
येवला – माणिकराव माधवराव शिंदे
नाशिक ग्रामीण- सचिन पंडितराव पिंगळे

महिला राखीव गट

- Advertisement -

१. सरला गुलाबराव कापडणीस
२. सिंधुबाई मोहनराव आढाव

:: परिवर्तन पॅनल ::
  • अध्यक्ष: ॲड.कोकाटे माणिकराव शिवाजीराव
  • उपाध्यक्ष: मोरे विश्वास बापूराव
  • सभापती: क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ
  • उपसभापती: मोगल देवराम बाबुराव
  • सरचिटणीस ॲड. ठाकरे नितीन बाबुराव
  • चिटणीस:दळवी दिलीप सखाराम

तालुका सदस्य उमेदवार

इगतपुरी गुळवे संदीप गोपाळराव
कळवण देवरे रवींद्र शंकर
दिंडोरी: जाधव प्रवीण एकनाथ
नाशिक शहर :लांडगे लक्ष्मण फकिरा
बागलाण: डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर
निफाड : गडाख शिवाजी जयराम
नांदगाव : पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग
चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव
देवळा : पगार विजय पोपटराव
मालेगाव : ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ
सिन्नर : भगत कृष्णाजी गणपत
येवला : बनकर नंदकुमार बालाजी
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग

महिला सदस्य

१. बोरस्ते शोभा भागवत
२. सोनवणे शालन अरुण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -