मविप्र रूग्णालयातील मृत्यूदर तब्बल १३ टक्के

corona patient dead body
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक जिल्हयाचा मृत्युदर दोन टक्के असतांना डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयातील कोरोना रूग्णांचा मृत्युदर तब्बल १३ टक्के असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले असल्याने याबाबत केंद्रीय सचिवांनी दखल घेत प्रशासन गंभीर नसल्याचे तोशेरे ओढले आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक याबाबत अभ्यास करत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता याच्या अभ्यासासाठी गेल्याच आठवडयात नाशिक दौरयावरर आलेल्या केंद्रिय पथकाने आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयाला दिलेल्या भेटीत या रूग्णालयातील मृत्युदर १३ टक्के असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. याबाबत रूग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता येथील कोविड सेंटरमध्ये गंभीर अवस्थेतील रूग्ण दाखल करण्यात येतात अशा रूग्णांचा एचआरसीटी स्कोर अधिक असतो अशा परिस्थितीत उपचार केले जातात. मुळात या रूग्णांची परिस्थिती अधिकच गंभीर असतांना अशा रूग्णांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतो. जेव्हा नाशिकमध्ये गंभीर रूग्णांना उपचार मिळत नव्हते तेव्हा मविप्र रूग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.