मविप्र : भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांचे मौन का? परिवर्तनचा सवाल

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतील सत्ताधार्‍यांवर आम्ही केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत नसल्याने त्यांचे भ्रष्ट व गैरकाराला समर्थन असल्याचा आरोप परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड.नितीन ठाकरे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी (दि.26) पत्रकार परिषदेत केला. मविप्र निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान होत आहे. तत्पूर्वी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांनी सत्ताधार्‍यांवर शरसंधान साधले. सरचिटणीसपदाचा गैरवापर केल्यानेच विद्यमान सरचिटणीसांच्या आजारात वाढ झाल्याचा टोला आमदार माणिकराव कोकाटे यांनी लगावला.

सत्ताधार्‍यांकडून बाह्यशक्तींचा उल्लेख वारंवार केला जात आहे. मात्र, या बाहयशक्तींची नावे सत्ताधार्‍यांकडून सांगितले जात नसल्याचे सांगत आमदार कोकाटे म्हणाले की, बाहयशक्तींची नावे सत्ताधाजयांनी जाहीर करावीत. सत्ताधाजयांच्या व्यासपीठांवर बाहयशक्तींचा वावर दिसत असल्याचे सभासद बघत आहे. कर्मवीरांच्या योगदानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे, आपण संस्थेत असताना काय दिले, काय केले हे सभासदांना दाखवा असे आवाहन कोकाटे यांनी यावेळी दिले. विद्यमान सरचिटणीस आपण आजारी असल्याने निवडणुक लढविणार नसल्याचे पहिले जाहीर करतात, पुन्हा घुमाजव करत रिंगणात उतरतात. आता प्रचारात पुन्हा मी आजारी असल्याचे सांगत आहे. पदाचा गैरवापर, एकाधिकारीशाही कारभारामुळेच सरचिटणींसांचे आजार वाढले असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी अ‍ॅड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, नानासाहेब दाते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, संस्थेत सुरू असलेल्या चुकीच्या कामकाज, गैरकारभारावर सभांमध्ये प्रश्नांची राळ उठविली. मात्र, सत्ताधार्‍यांकडून यास समर्पक उत्तरे देण्याऐवजी कर्मवारांच्या योगदानाचे मुद्दे उपस्थित करत सभासदांची दिशाभूल केली. सुज्ञ अन नवीन सभासदांस कर्मवीरांच्या त्याग, बलिदानाची माहिती आहे. त्यामुळे आम्ही केवळ संस्थेच्या काभारावर बोलत आहे. मात्र, सत्ताधाजयांकडे या प्रश्नांची उत्तरेच नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नवीन सभासदांना विरोध केलेला नाही. या संदर्भात मी कोठेही पत्र देखील दिलेले नाही. केवळ जिल्हयाबाहेरील व्यक्तींना चुकीच्या पध्दतीने केलेल्या सभासदत्वास माझा विरोध असल्याचेही स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. तसेच संस्था खाजगीकरण करण्याचा सुरू असलेल्या कारभाराला मी विरोध करत असून, सभासदांची संस्था सभासदांच्या हाती सुरक्षित ठेवण्यासाठी मी रिंगणात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

शरद पवार संस्थेचे मार्गदर्शक

सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बाह्यशक्ती असा सर्रासपणे उल्लेख करत आहे. कार्यकारी मंडळातील भांडणे सोडविण्यासाठी, पवार यांची मदत घेतली गेली त्यावेळी पवार बाह्यशक्ती नव्हते का? असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित करत, पवार हे संस्थेचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.